नळाच्या पाण्यात सापडले घातक प्लास्टिकचे अंश

0
42

प्रक्रिया करून नळाद्वारे पुरवठा केल्या जाणार्‍या पाण्यात सूक्ष्म स्वरूपातील धोकादायक प्लास्टिक तसेच लोहखनिजाचे अंश सापडले असल्याचे दिल्लीस्थित एनजीओ टॉक्सिक लिक या संस्थेने म्हटले आहे. मडगाव, पणजी, म्हापसा, माशेल व काणकोण या भागांतील पाण्यात हे हानिकारक पदार्थ आढळून आल्याचे संस्थेने म्हटले आहे.

एनआयओच्या वैज्ञानिक महुआ साहा यांची मदत घेऊन समुद्र विज्ञानच्या प्रयोगशाळेत हे पाण्याचे नमुने तपासण्यात आले. म्हापसा शहरातील नळातील पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म अंश सर्वात जास्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पणजी, मडगहाव, अस्नोडा, काणकोण तसेच साळावली व ओपाच्या पाण्यात हे प्लास्टिकचे अंश सापडले आहेत.

शिंपल्यांची मासळी तसेच मोरी ह्या जातीच्या मासळीतही सूक्ष्म प्लास्टिकचे अंश यापूर्वीच सापडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नळाच्या पाण्यातील सूक्ष्म प्लास्टिकचा अभ्यास करण्यासाठी अजून तपशीलवार अभ्यासाची आवश्यकता असल्याचेही साहा यांनी म्हटले आहे.