दिल्लीचे उर्जामंत्री सत्येंद्र जैन यांचे काल रविवारी गोव्यात आगमन झाले. गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याशी आज सोमवारी वीज प्रश्नावर त्यांची चर्चा होणार आहे . मंत्री श्री. जैन यांनी गोव्यात दाखल झाल्यानंतर कुडतरी, साळगाव येथील शेतकर्यांच्या तसेच महिला वर्गाच्या भेटीगाठी घेतल्या.
वीज शुल्काच्या वाढीमुळे आणि किमती वाढल्यामुळे गोव्यातील महिलांवर थेट परिणाम होतो, तर पीक व्यवस्थापनास पाठिंबा देण्यासाठी शेतात होणार्या नासाडीपासून झालेल्या अनेक मुद्द्यांबाबत गोव्याचे शेतकरी त्रस्त असल्याचे जैन यांनी सांगितले.