मनी लॅण्डरिंग प्रकरणी आज आरोप निश्‍चिती

0
45

उत्तर गोवा खास जिल्हा न्यायालयातर्फे जायका प्रकरणी लुई बर्जर मनी लॅण्डरिंग प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा विद्यमान आमदार चर्चिल आलेमांव यांच्याविरोधात आज सोमवार २६ जुलैला आरोप निश्‍चित करण्यात येणार आहे. आमदार कामत आणि आमदार आलेमाव यांना आज २६ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस जारी केली आहे. आमदार कामत आणि आमदार आलेमाव यांना या खटल्याला तोंड द्यावे लागणार आहे.

उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॅण्डरिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. जायका मलनिस्सारण प्रकल्पासाठी कामत यांनी १.२० कोटी, तर आलेमाव यांनी ७५ लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने २१ जुलै २०१५ रोजी आलेमाव, जायकाचे अधिकारी आनंद वाचासुंदर, लुई बर्जर कंपनीचे अधिकारी जेम्स मॅकक्लुंग, सत्यकाम मोहांती, रायचंद सोनी, आर्थुर डिसिल्वा यांच्यासह आमदार कामत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
ईडीने १२ जुलै २०१८ रोजी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.