>> चोवीस तासांत २२७ बाधित, पॉझिटिव्हिटी ४.०२ टक्के
राज्यात जुलै २०२१ या महिन्यात दुसर्यांदा शून्य कोरोना बळींची नोंद झाली आहे. चोवीस तासांत नवे २२७ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १७८८ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३१०१ एवढी आहे. राज्यातील नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यात तीन ते चार टक्के दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहे. हे प्रमाण आणखी कमी होण्याची गरज आहे.
राज्यात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या बळींमध्ये चढउतार सुरू आहेत. यापूर्वी एका दिवशी शून्य बळीची नोंद झाली होती. तर, दुसर्याच दिवशी चार बळींची नोंद झाली होती. राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४.०२ टक्के एवढे आहे. इस्पितळांतून १५ जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६९ हजार २१५ एवढी झाली आहे.
चोवीस तासांत ५६५१ स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २२७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
कुठ्ठाळी येथे सर्वाधिक १२५ रुग्ण आहेत. मडगाव येथे १२४ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील रुग्णसंख्या शंभरपेक्षा कमी आहे. नवीन २२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. नवीन २०५ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.
राज्यातील आणखी १७१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ३२६ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.११ टक्के एवढे आहे.