कोरोनाने ४ मृत्यूंसह रविवारी १६४ बाधित

0
103

>> पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ३.५६ टक्के

राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण आता हळूहळू घटत चालले असून कोरोनाबाधितांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. काल गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाचे नवे १६४ रुग्ण सापडले असून कोरोनामुळे चारजणांचा मृत्यू झाला. राज्यात ह्या महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ३०७३ एवढी झाली आहे. तर सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २०८७ एवढी खाली आली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६७,४३६ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर राज्यातील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ३.५२ टक्के एवढे खाली आले आहे.

चोवीस तासांत २०२ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात २०७ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६२,२७६ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १५ जणांना भरती करण्यात आले.
काल दिवसभरातील चोवीस तासांत राज्यात एकूण ४६०९ एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १४९ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

सर्वाधिक रुग्ण कुठ्ठाळीत
सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण कुठ्ठाळी येथे असून त्यांची संख्या ११८ एवढी आहे. त्या खालोखाल फोंडा येथे ११६, मडगाव येथे ११४, साखळी यथे ९१, पर्वरी ८८, सांगे ८८, म्हापसा ७३, पणजी ७१, चिंबल व खोर्ली प्रत्येकी ७०, कासावली ६५, कुडचडे ६३ असे रुग्ण आहेत.
आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,१६३ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,१५,७९५ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ९,३८,४५४ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.