उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी पुष्करसिंह धामी शपथबद्ध

0
96

उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे पुष्करसिंह धामी यांनी काल शपथ घेतली. डेहराडूनमध्ये संध्याकाळी ५ वाजता आयोजित शपथविधी सोहळ्यात त्यांना राज्यपाल बेबीरानी मौर्य यांनी शपथ दिली. गेल्या साडेचार वर्षांत उत्तराखंडला तिसरा मुख्यमंत्री मिळाला आहे. त्रिवेंद्रसिंह रावत, तीरथसिंह रावत हे दोन मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. धामी हे राज्याचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री झाले आहेत. पुष्करसिंह धामी यांच्यासोबत ११ मंत्र्यांनीही शपथ घेतली. मुख्यमंत्री बनलेले धामी हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. लखनऊमध्ये ९० च्या दशकात विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी ही त्यांनी संभाळली होती. राजनाथ सिंह त्यांच्या कामाने त्यावेळी प्रभावित झाले होते.