गोवा विद्यापीठाने पदवी परीक्षा तसेच गोवा विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय काल घेतला.
विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातून पदवी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची परीक्षा ९ जुलैपासून घेतली जाणार आहे, तर विद्यापीठ विभागातील विद्यार्थ्यांची परीक्षा १ जुलैपासून घेतली जाणार आहे. ही परीक्षा दोन तासांची असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका गुगल क्लासरूम, ईमेल, व्हॉट्सऍप आदी माध्यमातून पाठविली जाणार आहे. विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे थेट टाईपकरून पाठवू शकतात किंवा विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे वेगळ्या पेपरवर लिहून त्याचे छायाचित्र पाठवू शकतात.