कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या भाविकांच्या कोरोना चाचणीचे बनावट एका खासगी लॅबकडून सादर करण्यात आल्याच्या आरोपाबद्दल उत्तराखंड सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. या धार्मिक उत्सवात हजारो भक्तगण सामील झाले होते. एक एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हा कुंभमेळा हरिद्वार, डेहराडून, तेहरी आणि पौरी या ठिकाणी भरला होता.
यावेळी या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या भक्तांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यांचा हवाल बनावट बनवल्याचे एक प्रकरण समोर आले. ज्याचा अहवाल बनावट बनवला त्याने तक्रारीत आपले आधारकार्ड व मोबाईलक्रमांकही या बनावट अहवालासाठी वापरल्याचे म्हटले. त्या व्यक्तीला त्याची स्वॅब घेतल्याचा मेसेज आला. त्यामुळे त्या व्यक्तीने आयसीएमआरकडे तक्रार दाखल केली होती. आयसीएमारने उत्तराखंड सरकारच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली.
उत्तराखंड सरकारने या खासगी लॅबने कुंभमेळ्यादरम्यान केलेल्या सर्व चाचण्यांची प्राथमिक तपासणी केली असता अनेक बनावट अहवाल आढळून आले. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या लॅबला कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
एकूण २४ खासगी लॅब्ज कुंभमेळ्यादरम्यान सहभागी भाविकांच्या करोना चाचण्या करत होत्या. त्यापैकी १४ जिल्हा प्रशासनाने नेमून दिलेल्या होत्या तर १० कुंभमेळा व्यवस्थापनाच्या होत्या.