देशभरात चोवीस तासांत ८०,८३४ कोरोनाबाधित

0
52

देशातील कोरोना रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ सुरू आहे. मात्र अद्यापही करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांत देशभरात १ लाख ३२ हजार ०६२ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८० हजार ८३४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, ३ हजार ३०३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २,९४,३९,९८९ झाली असून, आजपर्यंत २,८०,४३,४४६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशभरात आजपर्यंत ३,७०,३८४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशातील सक्रिय रूग्णसंख्या १०,२६,१५९ एवढी आहे.
देशातील लसीकरण मोहीमेअंतर्गत आजपर्यंत २५,३१,९५,०४८ लोकांचे लसीकरण झालेले आहे. तर, देशभरात १२ जून पर्यंत ३७,८१,३२,४७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.