मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल महसूल खात्यातील अधिकार्यांची एक बैठक घेऊन त्यांना राज्यात कोविड रुग्णसंख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड व्यवस्थानाच्या कामात सरकारला सहकार्य करण्याचा आदेश दिला.
आपल्या अधिकार कक्षेतील गावात कोविडची स्थिती काय आहे, तेथे रुग्णसंख्या वाढत आहे का? जे रुग्ण आहेत त्यांची स्थिती काय आहे व ते वैद्यकीय सेवेचा लाभ घेत आहेत की नाही, गावातील लोक एसओपीचे पालन करत आहेत की नाहीत, जमावबंदीचे उल्लंघन होत नाही ना, प्रार्थनास्थळात गर्दी तर करत नाहीत ना? अशा सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून त्याची माहिती सरकारला देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या अधिकार्यांना दिले. राज्यातील उपजिल्हाधिकारी तसेच उच्चपदस्थ अधिकारी व अन्य वरिष्ठ नागरिकांसोबत मुख्यमंत्र्यांनी काल चर्चा केली.