राज्यातील कोविडचा वाढता संसर्ग व रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सरकारने राज्यातील सर्व ईएसआय दवाखाने बंद करण्याचा निर्णय घेतला असून तेथे काम करणार्या सर्व कर्मचार्यांना राज्यातील कोविड इस्पितळात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या दवाखान्यांत काम करणार्या सर्व डॉक्टरांना तसेच निमवैद्यकीय कर्मचारी, बिगरवैद्यकीय कर्मचारी आदींना गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याकडे येऊन ताबा घेण्यास सांगण्यात आले आहे. ईएसआय दवाखान्यांत येणार्या जनतेला आरोग्य केंद्रांत जाण्यास सांगितले गेले आहे.