महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनचे संकेत

0
143

महाराष्ट्रात १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली असली तरी गर्दी कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आता कडक लॉकडाऊन केले जाणार आहे. तशी मुख्यमंत्र्यांचीही भूमिका आहे, अशी माहिती काल राज्याचे मदत आणि पुनवर्सनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
येत्या दोन दिवसांत राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले जाणार असून त्यात लोकल रेल्वे प्रवासावर निर्बंध आणले जाऊ शकतात तसेच सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल विक्रीही बंद केली जाऊ शकते असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.