>> आरसीबीला आणखी एक धक्का
आयपीएलच्या १४ व्या पर्वाला उद्या दि. ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार असून त्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. त्यांचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ट्विटरद्वारे सॅम्सला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीला हा दुसरा धक्का बसला आहे. डॅनियलच्या अगोरद त्याचा युवा डवखुरा सलामीवीर देवदत्त पडिकलल यालाही कोरोनाची बाधा झाली होती. परंतु तो त्यातून बरा झाला असल्याचे समजते. डॅनियल सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
डॅनियल ३ एप्रिल रोजी भारतात पोहोचला होता आणि त्याने चेन्नईतील हॉटेलमध्ये चेक-इन केले. त्यावेळीचा करोनाचा अहवाल निगेटीव्ह आला होता. पण ७ एप्रिल रोजी त्याचा करोना चाचणीचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला. सॅम्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, पण त्याला करोनाची लक्षणे दिसत नाहीत, अशी माहिती आरसीबीने दिली. चेन्नईमध्ये मुंबई आणि बेंगलोर यांच्यात चेन्नईत ९ एप्रिलला होणार्या सामन्याने आयपीएलच्या १४व्या पर्वाला प्रारंभ होणार आहे. हा सामना सायं. ७.३० वा. होणार आहे.