मोटरसायकलची विजेच्या खांबास धडक; १ ठार

0
71

लोटली येथे मोटरसायकल अपघातात प्रमोदकुमार ठाकूर (२७) हा तरूण ठार झाला. आपल्या जी ए ०६ एच ०७१९ क्रमांकाच्या पल्सर मोटरसायकलने भरधाव वेगाने जात असता लोटली येथील वीज खांबाला त्याने धडक दिली. यावेळी डोके आपटल्याने तो जागीच ठार झाला.

मायणा कुडतरी पोलिसांनी तात्काळ त्याला हॉस्पिसियू इस्पितळात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याल मृत घोषित केले.