>> २४ तासांत २६५ रुग्ण
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असून काल रविवारी कोरोनाचे नवे २६५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या २ हजारांवर गेली असून ती २०७७ एवढी झाली आहे. तसेच काल एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या सध्या ८३५ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५९,०६८ एवढी झाली आहे.
काल राज्यात १६७ जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६,१५६ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्के झाले असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
सर्वाधिक रुग्ण पर्वरीत
सर्वाधिक रुग्णांची संख्या सध्या पर्वरीत २०७ एवढी असून त्याखाली मडगावात २०६ तर त्या खालोखाल राजधानी पणजीत १९९ रुग्ण आहेत.
काल खात्यातर्फे २०५७ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोना संसर्ग झालेल्या १६,५९८ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर ३१,७२८ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ५,५३,४११ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.
काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १०८ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर ४० जण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत.