काणकोणात सध्या कोरोनाचे १४ रुग्ण

0
169

येथील नगरपालिकाक्षेत्रातील देवाबाग या ठिकाणी काल २९ रोजी २ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १४ इतकी झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तालुक्यातील धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. बर्‍याच ठिकाणचे वार्षिक जत्रोत्सवही रद्द करण्यात आले आहेत. तर शिगमोत्सवाच्या काळात होणार्‍या दिवजोत्सवांवरही निर्बर्ंध घालण्यात आलेले आहेत. सार्वजनिक स्थळी मास्क वापरून आणि सामाजिक अंतर राखून व्यवहार करावा अशा सूचना आरोग्य केंद्र त्याच प्रमाणे अन्य सरकारी यंत्रणांकडून करण्यात येत आहेत. दक्षिण गोव्यात १४४ कलम लागू करण्यात आलेले आहे. मात्र, सार्वजनिक स्थळी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बाजारात ज्या व्यक्ती विनामास्क ङ्गिरतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.