खंडणीच्या आरोपांमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींस वेग

0
150

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या सनसनाटी आरोपांनी महाराष्ट्रातील राजकीय हवा तापली आहे. भारतीय जनता पक्षाने देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.

सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून त्यासंदर्भात माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्या नेतृत्वाखाली चौकशी केली जावी असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल व्यक्त केले आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा असल्याचे ते म्हणाले. सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज बोलावण्यात आली आहे.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी विभागाने दोघांना अटक केली आहे. माजी पोलीस कर्मचारी विनायक शिंदे (५५) व एक बुकी नरेश धारे (३१) यांना अटक करण्यात आली आहे.