नव्या ७३ रुग्णांसह काल एकाचा मृत्यू

0
250

राज्यात चोवीस तासांत नवे ७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ८०५ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ८१२ एवढी झाली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५६,१७३ एवढी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ५९ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५४ हजार ५५६ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१२ टक्के एवढे आहे. राज्यात कोरोना स्वॅबच्या चाचण्यांमध्ये वाढ होत नाही. साधारण दीड हजारांच्या आसपास स्वॅबच्या चाचण्यांची तपासणी होत आहे.

चोवीस तासांत नवीन १,६१८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४.५१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ४३ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
पणजीत उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९६ इतकी आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ११२ झाली आहे. चिंबल आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४० झाली आहे. पर्वरीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४१ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ५२ रुग्ण, म्हापसा ४३ रुग्ण, वास्कोत ५२ रुग्ण, कासावली ५५ रुग्ण, कुठ्ठाळीत ३२ रुग्ण, कांदोळी ३६ रुग्ण, चिंचिणी ३२ रुग्ण आहेत.

पंतप्रधानांनी साधला सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद

आपल्याला भीतीचे वातावरण निर्माण करायचे नाही. मात्र काही दक्षता बाळगून जनेतला संकटातून बाहेर काढायचेआहे. प्रत्येक राज्याचे विविध प्रयोग आहेत व चांगले प्रयोग आहेत. अनेक राज्ये नवनवीन प्रयोग शिकत आहेत. आता आपल्याला सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल म्हणाले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल बुधवारी पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पुजडे मोदी म्हणाले की, जिथे आवश्यक आहे तिथे मायक्रो कंटेंनमेंट झोन बनवण्याच्या पर्यायात अजिबात हयगय होता कामा नये. याशिवाय कोरोना लस वाया जाण्याचे प्रकार थांबवावे. असे आवाहन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले.