अखेर सचिन वाझेप्रकरणी मुंबई आयुक्तांची बदली

0
86

सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर काल बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांच्याघरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ जीपमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या प्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांनाअटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त व गृहमंत्री यांचे निलंबन करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांची काल बदली केली. याबद्दल बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी, एका सामान्य नागरिकाचा खून, एका एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांचे बंडल व नोटा मोजण्याचे मशीनही मिळते. गाडीत अनेक नंबर प्लेट मिळतात. यावरुन मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्याचा टोला लगावला आहे. तर परमबीर सिंह यांची बदली पुरेशी नसून ठाकरे सरकारने त्यांचे तात्काळ निलंबन करायला हवे. अशी मागणी भाजपचे अतुल भातखळकर यांनी केली आहे.