मंगळवारी कोरोनामुळे राज्यात चौघांचा मृत्यू

0
97

ार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या सध्या ८११ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले काल ९४ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ५६,१०० एवढी झाली आहे. तर सध्याच्या रुग्णांची संख्या ७९२ एवढी झाली आहे.

काल मृत्यू पावलेल्यांमध्ये बांदोडा येथील एक ४८ वर्षीय पुरुष, सावंतवाडी येथून उपचारासाठी आलेली एक ५८ वर्षीय महिला, ताळगाव येथे राहणारा व मूळ हैदराबाद येथील ५० वर्षीय पुरुष आणि कोलवा येथील एक ६५ वर्षीय महिला या चौघांचा समावेश आहे. या चारही जणांचे काल गोमेकॉत निधन झाले.

काल राज्यात ७३ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५४,४९७ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१४ टक्के झाले असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. काल खात्यातर्फे १५६६ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.

कोरोना संसर्ग झालेल्या १६,१५६ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर ३०,०८४ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ५,१७,२२९ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

सर्वाधिक रुग्ण पणजीत
उत्तर गोव्यात पणजीत व दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. पणजीत १०५ रुग्ण असून मडगावात रुग्णसंखअया १०३ झाली आहे. चिंबलमध्ये ४४, म्हापसा ५६, तर पर्वरीत ३३ रुग्ण आहेत. वास्को ५२, फोंड्यात ५७, कासावली ५१, कुठ्ठाळीत ३४ जण उपचार घेत आहेत.

मडगाव रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने पर्यटक

सध्या मुंबई येथून सहा ते सात रेल्वे गोवा व केरळपर्यंत ये जा करतात. त्यातही दिल्ली, गुजरात, नागपूर, उत्तरप्रदेश येथून हजारो प्रवासी मडगावसह गोव्यातील इतर रेल्वे स्थानकावर उतरतात. त्यांची तपासणी रेल्वे स्थानकावर केली जात नसल्याचे दिसून येते. काल मंगळवारी मडगाव रेल्वे स्थानकावर दीड हजारांहून अधिक पर्यटक उतरले. मडगाव रेल्वे स्थानकावर कोविड तपासणीची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ते पर्यटक तसेच गोव्यात पर्यटनासाठी विविध ठिकाणी निघून गेले. गोव्यात कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली येथून गोव्यात पर्यटक रेल्वे तसेच विमानमार्गे येत आहेत. कोलवा, बाणावली व इतर समुद्र किनार्‍यावर शनिवार व रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात व फिरण्यास जातात. पण त्यातील कोणीही मास्क घालत नाही. तसेच कुठेच सॅनिटायजरची व्यवस्थाही केलेली नाही.