शेतकर्‍यांचे आज देशभर ‘चक्का जाम’ आंदोलन

0
185

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपक्षाही जास्त दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी आज शनिवारी देशभरात चक्का जाम आंदोलन करणार आहेत. मात्र, दिल्लीसह उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथे उद्या चक्का जाम होणार नसल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी काल सांगितले. याबाबत टिकैत म्हणाले की, जे लोक दिल्लीला येऊ शकलेले नाहीत ते आपआपल्या ठिकाणी शांततेत चक्का जाम करतील. मात्र हा चक्का जाम दिल्लीत तसेच, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हे आंदोलन केले जाणार नाही. दिल्ली सोडून देशाच्या अन्य भागातील रस्ते बंद केले जातील. हे आंदोलन दुपारी १२ ते ३ असे तीन तास होईल. या काळात शेतकरी आपआपल्या भागांमधील रस्ते जाम करतील आणि रस्त्यांवर बसून विरोध दर्शवतील. तीन तासानंतर आंदोलकांकडून गाव, ब्लॉक, जिल्हास्तरावर स्थानिक अधिकार्‍यांना निवेदन दिले जाईल.