इलाही जमादार यांचे निधन

0
230

आपल्या लेखणीनं मराठी गझलविश्व समृद्ध करणारे गझलकार इलाही जमादार (७५) यांचे काल निधन झाले. जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी सांगलीतील दुधगाव येथे झाला होता. मात्र, त्यांचे वास्तव्य पुण्यात होते. सुरेश भटांनंतर मराठीत जमादार यांनी गझल समृद्ध केली. इलाही जमादार यांच्या गझला या महाराष्ट्रासोबतच देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रमाचे कार्यक्रमांनाही प्रेक्षकांची अलोट गर्दी असायची. त्याचबरोबर, अकाशवाणी, दूरदर्शनसोबतही त्यांनी काम केले आहे.