शेतकरी आंदोलनावर सरकार आणि शेतकरी यांनी मिळून तोडगा काढावा. जगातील कोणतेही आंदोलन दडपून किंवा चिरडून शांत करता येत नाही असे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले.
मी शेतकर्यांच्या समस्या समजू शकतो कारण मी स्वत: शेतकरी आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवणे देशाच्या हिताचे आहे. शेतकर्यांची समस्या सरकारने जाणून घ्यावी असे आवाहन करत मलिक यांनी, दोन्ही बाजूंनी जबाबदारीने चर्चेत सहभागी झाले पाहिजे असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले.
बहुतेक शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. यामुळे सरकारशी चर्चा करून तोडगा काढावा. पण जगातील कुठलेही आंदोलन हे दडपून किंवा चिरडून शांत केले जाऊ शकत नसल्याचे मतही यावेळी मलिक यांनी व्यक्त केले.
मूळचे उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी असलेले सत्यपाल मलिक सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी जम्मू-काश्मीर, गोवा, बिहार, ओडिशाचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.