जम्मूमध्ये एलओसीवर ३ अतिरेक्यांचा खात्मा

0
210

जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात एलओसीवर भारतीय जवानांनी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावेळी झालेल्या चकमकीत चार जवानदेखील जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत होण्यासाठी एलओसीच्या अखनूर सेक्टरच्या खौर भागात मंगळवारी सायंकाळी जोरदार गोळीबार सुरू केला. त्यात भारताचे चार जवान जखमी झाले. यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. याचबरोबर घुसखोरीचा डाव देखील अयशस्वी ठरवला. दहशतवाद्यांचे मृतदेह एलओसीवर पाकिस्तानच्या दिशेने पडलेले आहेत व ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याने उचललेले नाहीत. २०२१ मध्ये पाकिस्तानने पहिल्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.