पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

0
96

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली व आजार आणि दुखण्यातून लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

उपराष्ट्रपतीनींही घेतली भेट
गोव्याच्या दौर्‍यावर असलेले भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काल सकाळी भेट घेऊन नाईक यांच्याशी त्यांच्या आरोग्याविषयी तसेच उपचारांसंदर्भात चर्चा केली. यावेळी श्रीपाद यांनी उपराष्ट्रपतींना आपली प्रकृती आता सुधारू लागली असल्याचे सांगितले.