>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे स्पष्टीकरण
नगरपालिका निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर घ्यायच्या की नाहीत याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचा खुलासा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.
राज्यात लवकरच होणार असलेल्या नगरपालिका निवडणुका ह्या राजकीय पक्षांच्या चिन्हावर घ्यायच्या की काय याबाबत सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, असा खुलासा काल मुख्यमंत्र्यांनी केला.
सरकारने यहोणार असलेल्या नगरपालिका निवडणुका पक्षाच्या चिन्हावर न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त रविवारी काही वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. त्यासंबंधी काल मुख्यमंत्र्यांनी वरील खुलासा केला. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर घ्यायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप व्हायचा आहे, असा खुलासा काल मुख्यमंत्र्यांनी केला.
राज्यातील काही वर्तमानपत्रांनी रविवारी ठळकपणे त्यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध करताना भाजपने नगरपालिका निवडणुका पक्षाच्या चिन्हावर न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते. त्याचा खुलासा करताना तसा निर्णय झालेला नाही. त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे काल सावंत यांनी स्पष्ट केले.
दुरुस्ती अध्यादेशाविरोधात
७ रोजी पणजीत सभा
गोवा नगरपालिका (दुरुस्ती) अध्यादेश २०२०च्या निषेधार्थ अखिल गोवा व्यापारी संघटनेने दि. ७ जानेवारी रोजी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. या दिवशी व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार असून पणजीतील आझाद मैदानावर एका जाहीर सभेचे आयोजनही करण्यात येणार आहे. या अध्यादेशामुळे गेल्या एक दोन पिढ्यांपासून बाजारातील दुकाने चालवणार्या दुकानदारांना पुढील १० वर्षांनंतर आपली दुकाने सोडावी लागतील अशी भीती व्यापार्यांनी व्यक्त केली.