ऑक्सफर्ड – ऍस्ट्राझेेकाची कोरोनावरील लस भारतात उत्पादित करणार्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत चाळीस ते पन्नास लाख डोस उत्पादित करून साठा सज्ज ठेवला आहे, अशी माहिती कंपनीचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली.
कंपनी जुलै २०२१ पर्यंत सदर लशीचे ३०० दशलक्ष डोस तयार करील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. येत्या काही दिवसांत आम्हाला परवानगी मिळेल व त्यानंतर सरकार किती डोस खरेदी करायचे व किती वेगाने करायचे त्याचा निर्णय घेऊ शकते असेही पूनावाला म्हणाले.