नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारतीय विद्यार्थी आघाडीवर येतील

0
225

>> एनआयटी दीक्षान्त सोहळ्यात पोखरियाल यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आगामी काळात भारतीय विद्यार्थी जागतिक स्पर्धेत मागे पडणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एनआयटी गोवाच्या आभासी पद्धतीने आयोजित ६ व्या दीक्षांत सोहळ्यात बोलताना काल केले.
भारत वैज्ञानिक क्षेत्रात अनेक देशांसोबत संशोधन करत आहे. गोवा राज्य पर्यटनाबरोबरच उच्च शिक्षणामध्ये आघाडीवर आहे. कोविड १९ विरोधातील लढ्यात आयआयटी आणि एनआयटीच्या विद्यार्थ्यांनी योगदान दिलेले आहे, असेही केंद्रीय मंत्री पोखरियाल यांनी सांगितले.
दीक्षांत सोहळ्याचा दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. घेतलेले शिक्षण प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणण्याच्या दृष्टीने यापुढील वाटचाल ठेवावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री पोखरियाल यांनी यावेळी केले.