Home Featured कोरोनावरील ऑक्सफर्डची लस नव्या रूपावरही गुणकारी ?

कोरोनावरील ऑक्सफर्डची लस नव्या रूपावरही गुणकारी ?

0

कोरोनावर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्रा झेनेका यांनी निर्मिलेली लस कोरोनाच्या नव्या रूपावरही गुणकारी ठरू शकते असा दावा सदर कंपनीने केला आहे. या लशीचे उत्पादन भारतात पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात येणार आहे. कोविड झाल्यास ज्यांना इस्पितळात दाखल करावे लागेल अशा बारा ते पंधरा लाख लोकांना ही लस दिली जाईल असे सांगितले जात आहे. ऑक्सफर्डची ही लस साध्या फ्रीझमध्ये ठेवता येते व प्रत्येकी केवळ २ पाऊंडला विकली जाऊ शकते, त्यामुळे कोरोनाच्या नाशाला ती साह्यकारी ठरेल असा विश्वास ब्रिटीश तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. फायझरच्या लशीला वजा ७० अंश तापमान लागते.