कर्नाटक विधानपरिषदेत हाणामारी; कामकाज स्थगित

0
278

कर्नाटक विधानपरिषदेत काल कॉंग्रेसच्या एका सदस्याने अध्यक्षांना थेट खुर्चीवरून खाली खेचल्याची घटना घडली. या घटनेचे थेट चित्रीकरण सुरू होते. या घटनेनंतर सदनाचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.

कर्नाटकच्या वरिष्ठ सभागृहात काल गोहत्या बंदी विधेयक सादर केले जाणार होते. हे विधेयक हाणून पाडण्यासाठी कॉंग्रेसकडून आपल्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. परंतु, विधेयकावर मतदानाआधीच हा प्रकार घडला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच हा प्रकार घडला व पुढील अनर्थ टाळण्यासाठी मार्शल्सना हस्तक्षेप करावा लागला.

भाजप आणि जेडीएस यांनी बेकायदा सभापतींना खुर्चीवर बसवून असंविधानिक पद्धतीने वागत आहे असे म्हणत कॉंग्रेस आमदारांनी सभापतींना खुर्ची रिकामी करण्यास सांगितले होते. आणि त्यामुळे अवैध पद्धतीने बसलेल्या व्यक्तीला आम्हाला हटवावे लागले असे यावेळी बोलताना कॉँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी सांगितले. तर विधानपरिषदेच्या इतिहासात इतका लाजिरवाणा प्रकरा आपण पाहिला नसल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार लेहर सिंह सिरोया यांनी दिली.