शेतकर्‍यांची ८ रोजी ‘भारत बंद’ची हाक

0
228

>> आज केंद्र सरकारसोबत चर्चा

केंद्र सरकारसोबत कृषी कायद्यांसंदर्भात गुरूवारी चर्चा झाल्यानंतर शेतकरी संघटनांनी आपापसात चर्चा केली. त्यानंतर संयुक्त शेतकरी आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असे सांगत मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. तसेच केंद्र सरकारसोबत आज संघटनेची चर्चा होणार आहे.

सरकार या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार आहे, मात्र आम्ही सरकारकडे गुरूवारी झालेल्या चर्चेत तिन्ही कायदे मागे घेण्याची मागणी केली असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले.
आम्ही ८ डिसेंबरला संपूर्ण देशात टोल प्लाझा मोफत करणार असून दिल्लीतील उरले सुरले सर्व रस्तेही बंद करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. तसेच शेतकरी आज ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळाही जाणार असल्याचे नेत्यांनी जाहीर केले आहे. गेल्या ९ दिवसांपासून शेतकर्‍यांनी आंदोलन छेडले आहे.