कोरोनावरील पहिली लस पुढील आठवड्यात उपलब्ध

0
234

>> ब्रिटनमध्ये फायझर बायोएनटेकचे लशीकरण

कोरोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार असून ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली आहे. ब्रिटनच्या नागरिकांना पुढील आठवड्यापासून ही लस दिली जाणार आहे. दरम्यान, कोरोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती. ब्रिटन सरकारने फायझर व बायोएनटेकच्या लशीला काल परवानगी दिली. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

रशियातही लस
ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात लशीकरणाला सुरुवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर आता रशियातही पुढच्या आठवड्यात ऐच्छिक लशीकरणाला सुरूवात करण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी दिले आहेत.