कोरोनाने बुधवारी ४ मृत्यू

0
253

कोरोना संसर्ग झालेले ११७ नवे रुग्ण काल राज्यभरात आढळले. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४८२४१ एवढी झाली आहे. दरम्यान, काल राज्यात कोरोनामुळे ४ रुग्णांचे निधन झाले. निधन झालेल्यांमध्ये मडगाव येथील एका ३५ वर्षीय युवकाचा तसेच हॉस्पिसियो इस्पितळात आणलेल्या आणखी एका ३५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. शवचिकित्सा अहवालामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तसेच वेर्णा येथील एका ८५ वर्षीय वृद्धाचा तसेच केपे येथील एका ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. राज्यातील सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या १४१६ झाली आहे.