>> बेळगाव कर्नाटकचे’ म्हटल्याने निषेध
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सीमाभाग सूर्य चंद्र असेपर्येत कर्नाटकचाच राहील असे वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने उपमुख्यमंत्री सवदी यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध केला. तर सीमाभागातील महाराष्ट्रप्रेमींनी काळा दिन पाळला.
यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मूक फेरी काढण्यासाठी मागितलेली परवानगी शासनाने नाकारली. त्यामुळे या शासनाचा आम्ही धिक्कार करत असल्याचे शिवसेनेने सांगितले. तसेच यावेळी आम्ही सीमाभागात करत असलेले आंदोलन उपमुख्यमंत्र्यांनी रोखून दाखवावे असे आव्हान दिले. सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय करणार्या कर्नाटक शासन व उपमुख्यमंत्री सवदी यांचा जाहीर निषेध करत असल्याचे यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना कर्नाटक हद्दीत जाण्यापासून रोखले. यावेळी शिवसैनिकांनी महामार्ग रोखला. त्यामुळे पोलिसांनी महागार्माची एक तरी लेन सुरू ठेवा असे सांगितल्याने पोलीस व शिवसैनिकांमध्ये वादावादीही झाली.