नैऋत्य मोसमी पाऊस देशभरातून माघारी

0
258

नैऋत्य मोसमी पाऊस काल बुधवार दि. २८ ऑक्टोबरपासून गोव्यासह संपूर्ण देशातून माघारी परतल्याची घोषणा हवामान विभागाने काल केली आहे.
उत्तर भारतातून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला मागील आठवड्यात सुरुवात झाली होती. यावर्षी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे मोसमी पावसाच्या परतीला विलंब झाला.

या वर्षी गोव्यात मोसमी पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात आत्तापर्यंतच्या सर्वाधिक १६५ इंच पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत ८.२८ इंच पावसाची नोंद झाली आहे. गोव्यात मागील चोवीस तासांत पावसाची नोंद झाली नाही. तसेच, आगामी पाच दिवस हवामान कोरडे राहील. येत्या ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.