जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0
267

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील अरिबाग मचामा परिसरात भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मंगळवारपासून ही चकमक सुरू होती. यात दहशतवाद्यांशी लढताना एक जवान जखमी झाला.
जवानांकडून ठार करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी हे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी निगडित होते. यातील एक जण पाकिस्तानचा रहिवासी होता. तर दुसरा पुलवामा जिल्ह्यातील होता. अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या भागात दहशतवादी दडून बसलेले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळनंतर जवानांनी परिसरास घेराव घालत शोधमोहीम सुरू केली होती. जवानांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला, त्यास जवानांकडून चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवद्यांचा खात्मा केला.