पणजी परिसरात चोवीस तासात पावणे दोन इंच पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या मोसमी पावसाने पणजी शहर परिसराला सोमवारी रात्री झोडपून काढले.
राज्यात ऑक्टोबर महिन्यात आत्ता ८.२८ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे सर्वाधिक १२.७१ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथे ११.२५ इंच, फोंडा येथे १०.६० इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासांत केपे आणि साखळी येथेही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील इतर भागात कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली.