चोवीस तासांत ३ मृत्यू, २१५ बाधित

0
264

राज्यात चोवीस तासांत नवीन २१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोना पॉझिटिव्ह ३४५ रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ७४७ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या २३८४ एवढी झाली आहे. बांबोळी येथील इस्पितळातील कोविड प्रयोगशाळेत १९६१ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली असून त्यातील २१५ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत.
आणखी ३ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची बळींची संख्या ५८५ झाली आहे.

बांबोळी येथील गोमेकॉ आणि मडगाव येथील ईएसआय इस्पितळात प्रत्येकी १ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. हॉस्पिसियो इस्पितळात एका रुग्णाला मृतावस्थेत आणण्यात आले होते. त्याचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वास्को येथील ६४ वर्षांची महिला रुग्ण, पर्वरी येथील ७३ वर्षांचा पुरुष रुग्ण आणि कुडचडे येथील ३९ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.
बरे होण्याचे प्रमाण ९३%
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आत्तापर्यंत ९३.०५ टक्के कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ३९ हजार ७७८ एवढी आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या १७५ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या २१ हजार ३८३ एवढी झाली आहे. इस्पितळात नवीन ४६ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

पणजी नवे १५ रुग्ण
पणजी महानगरपालिका परिसरात नवीन १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सध्याच्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०३ एवढी झाली आहे. पणजीतील सांतइनेज, मिरामार, आल्तिनो, टोक, भाटले, रायबंदर, दोनापावल आदी भागात नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
उत्तर गोव्यात पर्वरी येथे सर्वाधिक १६९ रुग्ण आहेत. चिंबल येथे ११४ रुग्ण, कांदोळी येथे १०७ रुग्ण आहेत. दक्षिण गोव्यात मडगाव परिसरात सर्वाधिक २२८ रुग्ण आहेत. फोंडा येथे १५५ रुग्ण, वास्को येथे १२४ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील इतर भागातील रुग्णांची संख्या शंभरांपेक्षा कमी आहे.