कोरोनामुक्तीनंतर घ्यावयाची काळजी …

0
511
  • डॉ. मनाली म. पवार

कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही प्रभावी लस, औषध किंवा उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे लक्षणानुरूप या व्याधीची चिकित्सा केली जाते. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रानुसार ‘अमृतवल्ली’ या औषधाचा खूप चांगला उपयोग ह्या कोरोना विषाणूच्या विरोधात होत असल्याचे आढळून आले आहे.

कोरोना, कोविड-१९, क्वॉरन्टाइन ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना? पण काय करणार अजूनही आपल्याला सावधगिरी बाळगायलाच हवी. कारण कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. या जीवघेण्या आजारांवर जगभरात संशोधने चालू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जेवढ्या जलद गतीने वाढत आहे, तेवढ्याच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण बरेही होत आहेत. त्यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या जास्त आहे हे लक्षात घ्यावे. पण तरीही रुग्ण बरा होऊन हॉस्पिटलमधून घरी आल्यावर म्हणा किंवा घरी क्वॉरन्टाइन असल्यास त्याचे क्वॉरन्टाइनचे दिवस संपल्यावरसुद्धा काही गोष्टींची काळजी, खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. एकदा कोरोनाचा संसर्ग झाला, आता परत होणार नाही.. असा गैरसमज करून घेऊ नये. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, यासंबंधी काही नियम जारी करण्यात आले आहेत.
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्यावतीने, जे कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत, त्यांच्यासाठी सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. खरं तर कोरोनामुळे बरे झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी असतो असं म्हटलं जातं. पण त्यासाठी आपल्या आरोग्याची योग्य रितीने काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अन्यथा कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो.

कोरोनातून बरे झाल्यावर कशी घ्याल काळजी?

कोरोना किंवा कोविड-१९ हा आगंतुक व्याधी किंवा जनोपध्वंस व्याधी आहे. त्यामुळे संसर्ग पसरविण्यापासून टाळणे हीच त्याची प्रथम चिकित्सा आहे. म्हणून मास्क वापरत राहावे.

  • कोरोना हा श्‍वसनसंस्थेचा व्याधी असल्याने नाक व तोंड झाकेल असा मास्क हवा. कारण हा विषाणू नाकावाटे शरीरात किंबहुना ङ्गुफ्ङ्गुसात प्रवेश करतो. एकदा ङ्गुफ्ङ्गुसात प्रवेश झाला तर बर्‍याच वेळा रुग्ण दगावतो म्हणून सार्वजनिक ठिकाणी, हॉस्पिटल, गर्दीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणीही मास्क वापरणे अनिवार्य आहे. परत परत निक्षून सांगण्याचे तात्पर्य एवढेच की एकदा रुग्ण कोरोनातून बरा झाला की त्याला वाटते मास्क नाही वापरला तरी चालेल व मग मास्क हळूहळू नाका-तोंडावरून खाली उतरून गळ्यात येतो.
  • सामाजिक अंतराचे अनुसरण करतच रहावे. कोरोनातून रुग्ण बरा झाला तरी बर्‍याच वेळा थोडासा थकवा जाणवतो, असे बर्‍याच रुग्णांमध्ये आढळून आलेले आहे. त्यामुळे घरातून बाहेर न पडता घरातच विश्रांती घेणे जास्त गरजेचे आहे.
  • घरात किंवा ऑङ्गिसात कामाला हळूहळू सुरुवात करावी. मनाची व शरीराची शक्ती कमी झालेली असल्याने लगेचच कामाला लागू नये.
  • स्वच्छता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हात-पाय बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ धुवावेत. प्रत्येक वेळी गर्दीच्या ठिकाणावरून आल्यावर मात्र गरम पाण्याने आंघोळ करावी. कपडे धुवावेत.
  • पुरेशी झोप घ्यावी. मात्र लोळत राहू नये. आराम करा. सकाळ-संध्याकाळ आपल्याला झेपेल, आपण थकणार नाही एवढे चाला.
  • योगासने करा. विविध आसने करण्यापेक्षा काही मोजक्याच आसनस्थिती उत्तम आत्मसात करून त्यात दीर्घकाल त्रास न करता सुखाने राहता येईल अशी करावी. सुखकर आसनांमध्ये मनाचे लक्ष प्राणायामाकडे केंद्रित करणे सोपे जाते व त्यातून पुढे ब्रह्मचिंतनही करता येते.
  • दररोज योगासने, प्राणायाम आणि ध्यान करा. कोरोना हा श्‍वसन संस्थेमध्ये बिघाड करणारा व्याधी असल्याने प्राणायामाने रुग्णास मोठा ङ्गायदा होतो. प्राणायामाद्वारे श्‍वसनगती नियमित होते. प्राणायाम हा श्‍वसनाचा मोठा व्यायाम आहे. प्राणायामाद्वारे इंद्रियांचे चांगले नियमन होते.
  • मनातील भीती घालवण्यासाठी रामरक्षा स्तोत्र म्हणावे. महामृत्युंजय जप करावा किंवा नुसते रामनाम घेतले तरी मन सामर्थ्यवान होते.
    आयुष मंत्रालयाने दिलेली प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्यावी. कारण ज्याची व्याधी प्रतिकारशक्ती उत्तम असते, त्यांना आजार लवकर जडत नाही. कोणत्याही विषाणूचा शरीराशी संबंध आल्यानंतर शरीरात विकृती किंवा व्याधी उत्पन्न करण्याकडे त्यांचा कल असतो. परंतु शरीराचा त्याचवेळी व्याधी उत्पन होऊ न देण्याकडे प्रयत्न सुरू होतो. यामध्ये शरीराचा हा जो व्याधीविरोधी प्रयत्न कार्य करीत असतो त्यालाच ‘व्याधीक्षमत्व’ म्हणतात. या कोरोना विषाणूच्या बलापेक्षा जर आपले शरीर-मानस बल प्रभावी असेल तर व्याधिव्युत्पत्तिसाठी योग्य भूमी न मिळाल्यामुळे व्याधिहेतूचा प्रभाव पडत नाही व व्याधी (संसर्ग) टाळला जाऊ शकतो.
    व्याधीक्षमत्व हे अग्निबल, स्रोतसाचे प्राकृतत्व, धातूबल, ओज यांच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. म्हणूनच कोरोनाबाधेतून मुक्त झाल्यावरदेखील आहारावर विशेष लक्ष द्यावे. आहार हा जास्त संतर्पणक (प्रोटीन व्हिटामिन) युक्त ही असू नये. कारण जडान्नाचे सेवन केल्यास अग्निवर जास्त भार पडून अग्निमांद्यही होऊ शकते किंवा या संपूर्ण कोरोना महामारीच्या काळात अग्नी दूषितही होऊ शकतो. म्हणून साधा-हलका अग्निवर्धक असा आहार सेवन करावा.
  • अग्निवर्धनासाठी सुंठ, आले, दालचिनी, तमालपत्र, मिरी, लवंग यांसारख्या सौम्य मसाल्यांचा वापर करा.
  • त्याचबरोबर विषाणूची बाधा होऊ नये म्हणून यातील काही मसाल्यांची द्रव्ये, कांद्याची साले, लसणीची साले, निंबाची पाने, ओवा या द्रव्यांचे घरात सकाळ-संध्याकाळ धुपण करावे.
  • खाण्यामध्ये शक्यतो पालेभाज्या टाळाव्यात. कारण या महामारीमध्ये रासायनिक खते वापरून, ङ्गवारून वाढवलेल्या भाज्यांचे प्रमाण जास्त असण्याचे नाकारता येत नाही म्हणून शक्यतो आहारात डाळी, कडधान्यांचाच वापर करावा.
  • सतत गरम पाणी प्यावे. चांगले उकळून पाणी प्यावे. तापांसारख्या लक्षणांमध्ये काढ्याप्रमाणे उकळलेले पाणीसुद्धा औषधाचे कार्य करते.
  • ङ्गळांमध्ये व्हिटामिन ‘क’ र्ीं + ल युक्त ङ्गळे जास्त प्रमाणात खावी. त्यात आवळा हे सर्वश्रेष्ठ ङ्गळ आहे. ते एक चांगले रसायन द्रव्य आहे. म्हणून च्यवनप्राश, आमलक रसायन, आवळा कॅण्डी, आवळा रस, आवळा मुरब्बा, आवळा लोणचे इत्यादी कोणत्याही प्रकाराने आवळा खावा.
  • लिंबू पाणी, लिंबाचे लोणचेही आहारात सेवन करावे.
  • सुवर्ण सर्वश्रेष्ठ असे रसायन द्रव्य असल्याने सुवर्णसिद्ध जलही कोरोनामुक्त रुग्णांमध्ये वरदान ठरू शकते.
  • सकाळी चहाऐवजी तुळस, दालचिनी, सुंठ, मिरी या द्रव्यांनी बनवलेला चहाच प्यावा.
  • या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही प्रभावी लस, औषध किंवा उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे लक्षणानुरूप या व्याधीची चिकित्सा केली जाते म्हणूनच आयुर्वेद शास्त्रानुसार ‘अमृतवल्ली’ या औषधाचा खूप चांगला उपयोग ह्या कोरोना विषाणूच्या विरोधात होत असल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी गुळवेल काढा, गुळवेल, घनवटी, गुळवेलीचा स्वरस कोणत्याही प्रकारे सेवन चालू ठेवावे.
    कोरोना हा मुख्यत्वे करून कङ्ग-वातजन्य व्याधी असल्याने शक्य तितके उष्ण वातावरण रहावे, उष्ण आहार सेवन करावा, उष्णोदक प्यावे.
    आयुर्वेद शास्त्रानुसार कोरोना विषाणूची बाधा होऊ नये तसेच झाली तर त्यातून बरे होण्याकरिता म्हणा किंवा ‘रि-इन्ङ्गेक्शन’ होऊ नये म्हणून दिनचर्या व ऋतुचर्येचे पालन करावे.