खनिज वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित

0
270

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या एका बैठकीत राज्यातील खनिज माल वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित करण्यात आला आहे. खनिज माल वाहतुकीसाठी दहा किलोमीटरपेक्षा कमी अंतरासाठी प्रतिटन १४.५० रुपये, १० ते २० किलो मीटरसाठी प्रतिटन १४ रुपये आणि २० किलो मीटरवरील अंतरासाठी प्रतिटन १३.५० रुपये असा दर निश्‍चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खनिज माल वाहतुकीचा दर निश्‍चित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.