अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद न्यायालयीन निकालानंतर संपुष्टात आला असून आता मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रांगणात असलेली मशीद हटवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. ही याचिका मथुरा जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्वीकारली असून या न्यायालयात आता खटला चालणार आहे. यावर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीशेजारी असलेली शाही मशीद हटवण्याची मागणी या याचिकेत केली आहे.