बिहार विधानसभा निवडणूक; रालोआतून लोजप बाहेर

0
117

बिहार विधानसभा निवडणुकीअगोदरच ‘एनडीए’त फूट पडली असून पासवान यांनी लोक जनशक्ती पक्षाने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, गरज पडल्यास भाजपाबरोबर काम करण्याची तयारी असल्याचेही सांगितले आहे. रविवारी दिल्लीत पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय लोक जनशक्ती पक्षाकडून घेण्यात आला.

दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) जागा वाटप पूर्ण झाले असून जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भाजप यांच्यामध्ये ५०-५० फॉर्म्युला ठरला आहे. जागा वाटपाबाबत जेडीयू आणि भाजप यांच्यामध्ये पाटण्यात चर्चेची चार तासांची अंतिम बैठक झाली. नितीशकुमार यांचा जेडीयू पक्ष एकूण २४३ जागांपैकी १२२ जागांवर तर भाजप १२१ जागांवर लढणार आहे. जेडीयू आपल्या वाट्यातील पाच ते सात जागा हिंदुस्तानी आवाम पक्षाला तर भाजप आपल्या कोट्यातून रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला काही जागा देण्याचे निश्‍चित झाले होते. मात्र रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी भाजपकडे ४२ जागा मागितल्या होत्या. तर भाजपने त्यांना १५ जागा देणे मान्य केले होते. त्यामुळे लोजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.