देवसू-पेडणे येथे अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

0
274

काल रविवार दि. २७ रोजी सकाळी ११.३० वाजता प्रज्ञा हायस्कूल देवसू येथे दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा रस्त्यावर गतिरोधकावरून उसळून पडल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन मृत्यू झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रमोदिनी प्रभाकर ठाकूर (५५) असे या महिलेचे नाव आहे.

पाडलोस्करवाडा धारगळ येथील प्रभाकर ठाकूर व त्यांची पत्नी प्रमोदिनी ही उभयता ऍक्टिवाने हरमल येथे जात होती. प्रमोदिनी यांच्या मावशीच्या मुलीचे निधन झाल्यामुळे मावशीला भेटण्यासाठी म्हणून ती जात होती. यावेळी देवसू येथे प्रज्ञा हायस्कूलजवळ असलेला गतिरोधक पांढरे पट्टे नसल्यामुळे त्यांना दिसला नाही व यावेळी दुचाकी हलली. यामुळे प्रमोदिनी ह्या गाडीवरून मागे पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा होऊन रक्तस्त्राव झाला. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना तुये आरोग्य केंद्रात नेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांना दोन मुलगे व एक मुलगा असा परिवार आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बांबोळी येथे गोवा वैद्यकीय इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठवून दिला.