>> सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांची स्पष्टोक्ती
कोरोनासाठीचे लसीकरण सर्वांपर्यंत पोहोचवणे सन २०२४ चे वर्ष संपेपर्यंत सर्वस्वी अशक्य आहे अशी स्पष्टोक्ती सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांनी केली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ह्या जगातील सर्वांत मोठ्या लस उत्पादक कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी हे मत व्यक्त केले आहे. जागतिक लोकसंख्येला सामावून घेण्याइतपत लस उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न जगातील फार्मास्युटिकल कंपन्यांकडून झालेले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जगात सर्वांपर्यंत कोरोनाची लस पोहोचण्यास आणखी चार ते पाच वर्षे लागतील, असे ते म्हणाले. सिरम इन्स्टिट्यूटने ऍस्ट्राझेनेका, गामालेया, नोव्हाव्ॅहक्ससहित पाच आंतरराष्ट्रीय फार्मा कंपन्यांशी कोरोना लस निर्मितीसाठी भागीदारी केली आहे. एक अब्ज डोस उत्पादित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असून त्यापैकी पन्नास टक्के भारतीयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.