>> इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न डॉक्टर रुग्णांच्या संपर्कात राहणार
>> वाढत्या कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर दिलासा
सलेले जे रुग्ण आपल्या घरी विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत अथवा घेऊ इच्छित आहेत अशा रुग्णांना इंडियन मेडिकल असोसिएशनशी संबंधित राज्यातील डॉक्टर दूरध्वनीवरून मोफत वैद्यकीय सेवा देणार असल्याची माहिती डॉ. शेखर साळकर यांनी काल दिली. त्यासाठी राज्य सरकार व आयएमए यांच्यात करार झाला आहे.
राज्यातील आयएमएशी संलग्न १५० डॉक्टरांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेणार्या कोरोना रुग्णांना दूरध्वनीवरून आवश्यक तो वैद्यकीय सल्ला विनाशुल्क देण्याची तयारी दाखवली असल्याचे डॉ. साळकर यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या घरी जर त्यांच्यासाठी वेगळी खोली व वेगळे शौचालय असेल तर तो घरीच विलगीकरणात राहून उपचार घेऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्याला उपजिल्हाधिकार्यांकडे ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हे आयएमएचे डॉक्टर, घरी विलगीकरणात राहून उपचार घेणार्या कोरोना रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यास पुढे आले असल्याने या रुग्णांना चांगले उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले.
अशा प्रकारे घरी राहून उपचार घेणार्या कोरोना रुग्णांसाठी आयएमएने एक वैद्यकीय किटही तयार केलेले असून त्याची किंमत २५०० रु. एवढी आहे. मात्र, हे वैद्यकीय किट आयएमएकडूनच घ्यायला हवे, अशी अट नसून रुग्ण ते त्याच्यापेक्षाही स्वस्त दरात कुठे मिळत असेल तर तेथूनही घेऊ शकतात, असे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले. या वैद्यकीय किटमध्ये पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर, व्हिटामीन ‘सी’ च्या गोळ्या तसेच व्हिटामीन ‘ए’ व ‘बी’ कॉम्प्लेक्स व झिंकच्या गोळ्या तसेच पावडर स्वरूपातील व्हिटामीन ‘डी’, मास्क, फेस शिल्ड, हातमोजे, सॅनिटायझर, वापरलेले साहित्य घालून ठेवण्यासाठीची एक पिशवी व एक लाल पिशवी आदींचा समावेश असल्याचे डॉ. साळकर म्हणाले.
घरगुती विलगीकरणाखाली असलेल्या कोरोना रुग्णांशी त्या त्या भागातील आयएमएचे डॉक्टर रोज दोन वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधून औषध कसे घ्यावे, अन्य कोणती खबरदारी घ्यावी, स्वच्छता कशी पाळावी, घरातील अन्य लोकांपासून अंतर कसे ठेवावे आदी सगळी माहिती देणार असल्याचे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले. व्हिटामीन ‘सी’ची गोळी दिवसाला दोन वेळा, ए, बी व झिंकची दिवसाला एक वेळा, व्हिटामीन ‘डी’ची पावडर आठवड्याला एक वेळा अशी ही औषधे कोमट पाण्याबरोबर घ्यायची असून त्यासंबंधीची सगळी माहिती डॉक्टर दूरध्वनीवरून रुग्णाशी दिवसाला दोन वेळा संपर्क साधून देणार असल्याचे ते म्हणाले.
सीएमओ कार्यालयातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पालयेकर व आयएमएचे डॉ. सेम्युएल हे या व्यवस्थेवर लक्ष ठेवणार असून लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती डॉ. साळकर यांनी दिली.
आयएमएशी संलग्न स्थानिक डॉक्टर रुग्णांशी संपर्कात राहील व औषधांसाठी मार्गदर्शन करील.
घरी विलगीकरणात राहणार्यांसाठी किट
-: काय असेल किटमध्ये?:-
व्हिटामीन ‘सी’च्या गोळ्या
व्हिटामीन ‘डी’ची पावडर
व्हिटामीन ‘बी’ कॉम्लेक्स गोळ्या
झिंकच्या गोळ्या
क्रोसीन गोळ्या
वापरलेले साहित्य फेकण्यासाठी
लाल व पिवळ्या रंगाची पिशवी
पल्स ऑक्सिमीटर
थर्मामीटर हातमोजे
मास्क सॅनिटायझर