>> पुढील आठवड्यात शिक्षा सुनावणार
पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मेरशी येथील २०१३ मधील गाजलेल्या मजूर दांपत्याच्या दुहेरी खून प्रकरणी ओस्बान लुकास फर्नांडिस (मेरशी) आणि रमेश बागवे (मूळ- मालवण) यांना दोषी ठरविले असून शिक्षा पुढील आठवड्यात सुनावली जाणार आहे.
मेरशी येथे शिवाजी नाईक या मूळच्या कोल्हापूर येथील मजुराचा खून करून त्याचा मृतदेह ओस्बान याचा मालकीच्या जागेत पुरण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. तर, सुजाता हिचा मृतदेह अनमोड घाटातून ताब्यात घेण्यात आला होता.
संशयित आरोपी ओस्बान याने शिवाजी बेपत्ता झाल्याने त्याची पत्नी सुजाता हिला सांगितले होते. ती जास्तच चौकशी करून लागल्याने ओस्बान याने तिला व दोन मुलांना मूळ गावी पोहोचविण्याचे निमित्त करून अनमोड घाटात हल्ला करून घाटात फेकून दिले असा आरोप आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात दुहेरी खून प्रकरणी शिक्षा ठोठावण्याबाबत पुढील आठवड्यात सुनावणी घेतली जाणार आहे.