महाविद्यालयीन प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून

0
103

सरकारी तसेच अनुदानित महाविद्यालयांतील प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून सुरू होत आहे. बी. ए, , बी. कॉम. बी. एस्सी, बीसीए, बीबीए, संगीत, गृहविज्ञान, कृषी, बीएस्सी. बी.एड, बी. ए. बी. एड व इतर अभ्यासक्रमांसाठी आज दि. २८ ऑगस्टपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरू होणार आहे.
उच्च शिक्षण संचालनालयाच्या https://www.dhe.goa.gov.in या संकेतस्थळावर त्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. ज्यांनी पहिल्या फेरीत अर्ज केलेले आहेत व ज्यांना अजून कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही, त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही असे कळविण्यात आले आहे.