कोरोनाबाधित व्यक्तीला बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याची एक घटना हॉंगकॉंगमध्ये उघडकीस आली असून हे पहिल्यांदाच घडले आहे. गेल्या एप्रिलमध्ये कोरोनाबाधित झालेल्या एका ३३ वर्षीय तरुणाला बरे झाल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
युरोपमधून तो हॉंगकॉंगला परतला असता विमानतळावरील तपासणीत तो पुन्हा कोरोनाबाधित झाला असल्याचे स्पष्ट झाले. त्याला कोरोना विषाणूच्या दोन रुपांतरांचा संसर्ग झाला असल्याचे हॉंगकॉंगमधील संशोधकांनी स्पष्ट केले आहे. सदर तरुणाला दुसर्यांदा झालेल्या संसर्गात कोणतीही बाह्य लक्षणे आढळून आली नव्हती. त्यामुळे पुन्हा संसर्ग झाला तरी त्याचे स्वरूप सौम्य असावे असे या संशोधकांचे म्हणणे आहे. आधीच्या विषाणूच्या शरीरात राहण्यामुळे त्याला पुन्हा बाधा झाली की त्याला नव्याने कोरोना संसर्ग झाला याचा सध्या शोध घेतला जात आहे.