नॉर्थईस्ट युनायटेडचे जेरार्ड नूस प्रशिक्षक

0
110

इंडियन सुपर लीगच्या आगामी मोसमाच्या पार्श्‍वभूमीवर नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने काल मंगळवारी जेरार्ड नूस यांना नवीन प्रशिक्षक म्हणून करारबद्ध केल्याची घोषणा केली. स्पेनचे ३५ वर्षीय नूस हे क्लबच्या इतिहासातील सर्वांत युवा प्रशिक्षक ठरले आहेत.

‘नॉर्थईस्ट युनायटेड एफसीसोबत काम कररण्यास उत्सुक आहे. आशिया खंडातील क्लबसोबत काम करण्याची ही माझी तिसरी वेळ असेल. माजी माजी बॉस अवराम ग्रांट यांच्याकडून क्लबची संस्कृती, चाहते आदींबाबत खूप ऐकले आहे. प्रशिक्षण पथक व खेळाडूंसोबत मिळून क्लबला हवे असलेले निकाल देण्याचा माझा प्रयत्न असेल, असे नूस यांनी म्हटले आहे.

नूस यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात लिव्हरपूल एफसी अकादमीकडून केली होती यानंतर त्यांना पदोन्नती मिळून ते राफेल बेनिटेझ यांच्या प्रशिक्षण पथकाचे सदस्य झाले होते. त्यांना ब्रायटन अँड होव्ह ऍल्बियन व एएफसी एसकिलस्टुना या अकादमींसोबत काम करण्याचा अनुभवदेखील आहे.

प्रमुख क्लबांचा विचार केल्यास अमेरिकेमधील रायो ओकेसी व कझाकस्तानमधील एफसी इर्तिश पावलोदार यांच्या मुख्य संघाचे ते व्यवस्थापक होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर घानाच्या राष्ट्रीय संघाचे साहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी होती.

नॉर्थईस्टचे माजी प्रशिक्षक ग्रांट यांच्या हाताखाली त्यावेळी त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. ला लिगामघील एल्चे सीएफ व रायो वालेकानो या क्लबांचे क्रीडा संचालक म्हणूनही त्यांनी काही काळ घालवला आहे. नूस यांच्या नियुक्तीबद्दल बोलताना नॉर्थईस्ट युनायटेडच्या कार्यकारी संचालक प्रिया रुंचाल म्हणाल्या की, ‘क्लबचा पुढे नेण्यासाठी नूस यांनी सादर केलेल्या योजनेने आम्ही प्रभावित झालो. जगात वेगवेगळ्या स्तरावर व भिन्नभिन्न वातावरणात खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा त्यांना असलेला अनुभव त्यांच्या निवडीसाठी उपयोगी ठरला. नवीन खेळाडूंमधील गुण ओळखून त्यांा पैलू पाडण्यासाठीदेखील नूस यांना ओळखले जाते. यामुळे क्लबला त्यांचा मोठा लाभ होईल’, अशी आशा आहे.