Home बातम्या बंडखोरांच्या मनधरणीसाठी ऑस्कर फर्नांडिस गोव्यात

बंडखोरांच्या मनधरणीसाठी ऑस्कर फर्नांडिस गोव्यात

0

विविध मतदारसंघांत कॉंग्रेस उमेदवारांविरुद्ध उभे ठाकलेल्या कॉंग्रेस बंडखोरांचे मन वळविण्यासाठी अ.भा. कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा छाननी समितीचे अध्यक्ष ऑस्कर फर्नांडिस यांचे काल गोव्यात आगमन झाले. दि. १६पर्यंत त्यांचे गोव्यात वास्तव्य असेल.

भाजप-मगो युती, कुटुंबातील अनेकांना उमेदवार्‍या अशा मुद्यावर आधीच पेचात सापडलेल्या कॉंग्रेससची वाट बंडखोरांनी आणखी बिकट केली आहे, त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी फर्नांडिस यांना पाठविल्याचे कळते.